Special Report | NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी, निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे वाद वाढला
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या नाराजीची झलक निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रातही दिसून आली आहे. संबंधित पत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर ‘अध्यक्षा’ आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर ‘खजिनदार’ असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांसमोर कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, हे पत्र प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी 16 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रानंतर लिहिले गेले आहे. त्या पत्रामध्ये प्रफुल पटेल यांना ‘राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून अध्यक्षांचे अधिकार देण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अचानक दिल्लीत दाखल झाल्यामुळे या घडामोडींना आणखी राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, पक्षातील अंतर्गत तणाव वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
