कर्जमाफीबाबत जाब विचारत सुनील तटकरेंवर त्यांचेच कार्यकर्ते भडकले!

कर्जमाफीबाबत जाब विचारत सुनील तटकरेंवर त्यांचेच कार्यकर्ते भडकले!

| Updated on: Jul 25, 2025 | 10:15 AM

लातूरमध्ये विजय घाडगेंना झालेल्या मारहाणीपूर्वी सुनील तटकरे यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने खडेबोल सुनावले होते.

लातूरमध्ये विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणीपूर्वी सुनील तटकरे यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने खडेबोल सुनावले होते. धारशिव येथून आलेल्या एका कार्यकर्त्याने कर्जमाफीवरून सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी तटकरे मीटिंग हॉलमधून उठून तडक बाहेर निघून गेले. बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीसाठी फिरत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही का बोलत नाही? शेतकरी कर्ज माफीच्या प्रश्नाचं पुढे काय झालं? आमच्याकडे कोणतं पद नाही, तरी आम्ही धारशिववरून आलोय आणि तुम्ही कर्जमाफीवर काहीही बोलत नाही, अशा शब्दात खडेबोल या कार्यकर्त्याने सुनील तटकरे यांना सुनावले. मात्र त्यावर काहीही उत्तर न देताच सुनील तटकरे हे लागलीच बैठक खोलीतून बाहेर निघून गेल्याचं बघायला मिळालं. हा व्हिडीओ आता समोर आला असून विजय घाडगे यांना मारहाण होण्यापूर्वीचा हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published on: Jul 25, 2025 10:15 AM