Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Jan 28, 2022 | 3:31 PM

हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की, हे बाराही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरोधात आवाज उठवत होते.

Follow us on

आज भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय अखेरीस सर्वोच्छ न्यायालयाने दिला आहे. या प्रकणानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुध्दा या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आता हे 12 आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेत आपलं कर्तव्य बजावण्याकरता पात्र ठरवले आहेत. हा निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे की, हे बाराही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरोधात आवाज उठवत होते. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि लोकशाहीला अंजण घालणारा असल्याचे अशिष शेलार यांनी म्हणटले आहे.