Super Fast News | 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे

| Updated on: Mar 17, 2023 | 8:18 AM

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळतील अशी माहिती विधानपरिषदेत दिली.

Follow us on

सुपरफास्ट 50 न्यूज | मुंबईकडे येणाऱ्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र निर्णयांची अंमलबजावणी होईपर्यंत हा मोर्चा माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी घेतली आहे. तर आज शेतकऱ्यांच्या मागणीवर निवेदन मुख्यमंत्री शिंदे सादर करणार आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळतील अशी माहिती विधानपरिषदेत दिली. तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी, जुन्या पेन्शन बाबतचा निर्णय चर्चेतून होईल, चर्चेविना कोणताही निर्णय योग्य ठरणार नसल्याचे म्हटलं आहे. तर सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनवरून संपावर गेल्याने नागपूर मेडीकलमध्ये तीन दिवसात 40 मृत्यूची नोंद झाली आहे. 900 नर्सेस संपावर असल्याने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे.