VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 01 January 2022
महाराष्ट्रात ओमिक्रॉन दुपटीनंन वाढतं आहे. राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल, असं उदय सामंत म्हणाले. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून जो अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत निर्णय घेऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात ओमिक्रॉन दुपटीनंन वाढतं आहे. राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाला याचा विचार करावा लागेल, असं उदय सामंत म्हणाले. येत्या 3 तारखेला कुलगुरूंची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून जो अहवाल येईल त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करत निर्णय घेऊ, असं उदय सामंत म्हणाले आहेत. राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरु असणाऱ्या परीक्षा, अभ्यासक्रम आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यासंदर्भात नेमक्या काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली.
