VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 December 2021

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 December 2021

| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 3:14 PM

कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांनी चक्क कोरोना (Corona) म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे इथे उधळली. इतकेच काय कोरोनाचे मृत्यू म्हणजे डॉक्टरांनी लोकांना मारले. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली, असा जावई शोधही त्यांनी लावला. आता त्यांच्या वक्त्व्यावर बोलणार तरी काय?

अध्यात्म स्वःचा शोध घेण्याचे सगळ्याचे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. तो कसा घ्यावा, त्यासाठी कोणता पंथ, धर्म अंगीकारावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न. या शोधात थोडेफार सहकार्य करायचे काम गुरूंनी, महाराजांनी केले जावे, अशी अपेक्षा असते. इथे ते राहिले बाजूलाच. ज्या विषयाचा आपल्याला गंधही नाही, तिथे आपले अगाज्ञ ज्ञान प्रकट करण्याची अहमिका सुरू असते. याचाच प्रत्यय सांगली येथे कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या वक्तव्यात आला. त्यांनी चक्क कोरोना (Corona) म्हणजे फर्जीवाडा असल्याची मुक्ताफळे इथे उधळली. इतकेच काय कोरोनाचे मृत्यू म्हणजे डॉक्टरांनी लोकांना मारले. त्यांच्या किडनी आणि अवयवांची तस्करी केली, असा जावई शोधही त्यांनी लावला. आता त्यांच्या वक्त्व्यावर बोलणार तरी काय?