VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 28 November 2021

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 28 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 3:31 PM

राज्यातली महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी बेनामी प्रॉपर्टीसाठी आई, मायचा तर कोणी ताई, पत्नीचा वापर करत आहे, अशा आरोपांची राळ रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उडवून दिली. ते मुलुंड येथे बोलत होते.

राज्यातली महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी आहे. या सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली आहे. कोणी बेनामी प्रॉपर्टीसाठी आई, मायचा तर कोणी ताई, पत्नीचा वापर करत आहे, अशा आरोपांची राळ रविवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उडवून दिली. ते मुलुंड येथे बोलत होते. सोमय्या म्हणाले, नवाब मलिक एवढे का घाबरत आहेत? की ते अनिल देशमुखच्या शेजारची आर्थर रोड जेलची खोली बुक करत आहेत का? मलिकांनी वक्फबोर्ड जमिनीचा घोटाळा केला असेल तर त्यांच्यावर निश्चित कारवाई होणार. मग ते नवाब असो की मलिका. कोणत्याही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आतापर्यंत आम्ही 28 घोटाळे काढले. कदाचित 29 वा नंबर नवाब मालिक असू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.