ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांच्या मते, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात निर्णय देणे चुकीचे होते.
निवडणूक आयोगाने अपात्रता प्रकरणाच्या निकालाची वाट पाहायला हवी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. सिब्बल यांनी 2018 च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनाच पक्षाचे सर्वाधिकार होते, यावर भर दिला. पुढे गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले, असा युक्तिवादही त्यांनी केला. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना त्यावेळी तुमची संख्या किती होती? असा सवाल केला. यावर सिब्बल यांनी आमची संख्या 55 होती असे उत्तर दिले. अपात्रता प्रकरण महत्त्वाचे असून त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे सिब्बल यांनी सांगितले, मात्र सरन्यायाधीशांनी हे प्रकरण आता सक्रिय राहिलेले नाही अशी टिप्पणी केली. या युक्तिवादांमुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळत आहे.
