Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

| Updated on: Jun 23, 2026 | 12:14 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार फुटण्यामागे विकासनिधी न मिळणे हे कारण सांगितले जात असेल, तर विरोधी पक्षांच्या खासदारांना निधी का दिला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “जर निधी न मिळाल्यामुळे खासदार पक्ष सोडत असतील, तर सर्वप्रथम हा प्रश्न विचारला पाहिजे की विरोधी पक्षांच्या खासदारांना निधी दिला जात का नाही?”

त्यांनी पुढे म्हटले की, “सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार हे एकाच निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेले असतात. जनतेने त्यांनाही तितकाच कौल दिलेला असतो. मग विकासनिधीच्या बाबतीत भेदभाव का केला जातो?”

अंधारे यांनी आरोप केला की, विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी सत्ताधारी जाणीवपूर्वक निधी रोखून धरतात. “विरोधकांना वेठीस धरण्याचा, त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो का? याचं उत्तर दुर्दैवाने होय असंच आहे,” असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पक्षांतरामागील कारणांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे.

Published on: Jun 23, 2026 12:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us