Ranjit Kasale : वाल्यानं 25 मर्डर केले, माझ्याकडे पुरावे अन्… कराडबद्दल खळबळजनक दावा, थेट व्हिडीओ शेअर

Ranjit Kasale : वाल्यानं 25 मर्डर केले, माझ्याकडे पुरावे अन्… कराडबद्दल खळबळजनक दावा, थेट व्हिडीओ शेअर

| Updated on: Aug 01, 2025 | 1:34 PM

मी पुराव्यासकट व्हिडीओ बनवेल, वाल्मिक कराडने परळीत कमीत कमी २५ एक मर्डर केल्याचा खळबळजनक दावा बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी केलाय.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांच्या क्रूर हत्येत अनेक साम्य आहेत. संतोष देशमुखांनी गावातल्या पवनचक्की प्रकल्पातून खंडणी उकळण्यास विरोध केला म्हणून त्यांची हालहाल करून हत्या केली आणि महादेव मुंडेनी १८ गुंठे जमीन विकण्यास नकार दिला म्हणून त्यांच्याही शरीराचे तुकडे करण्यात आले. या दोन्ही हत्यामध्ये आरोपांची सूई वाल्मिक कराडकडे जात असल्याचे वाल्मिक कराड आता गोत्यात आलाय. यानंतर बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेंनी वाल्मिक कराडबद्दल एक मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

बडतर्फ पीएसआय रणजीत कासले यांनी एक व्हिडीओ शेअर करत वाल्मिक कराडने परळीत कमीत कमी २५ मर्डर केले असतील असा दावा केलाय. इतकंच नाहीतर हे २५ खून करून ते नष्ट करणाऱ्यासाठी नदी, तळ्यात, नाल्यात मृतदेहाचे तुकडे टाकले असतील. हा विकृत माणूस आहे. आजही जेलमध्ये असताना तो मला त्रास देतोय. तर १४ वर्षांच्या मुलाचा मर्डर केल्याचे माझ्याकडे पुरावे असल्याचेही रणजीत कासले यांनी म्हटलंय.

Published on: Aug 01, 2025 01:19 PM