Breaking | तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन घटनास्थळी जाणार

| Updated on: Dec 08, 2021 | 4:26 PM

डिजीपींना तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत. हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहेत.

Follow us on

तामिळनाडू हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर गेला आहे तर सीडीएस बिपिन रावत गंभीर जखमी झाले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे संसदेत माहिती देणार असून त्यानंतर ते घटनास्थळी रवाना होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे देशभरातील हलचाली आता वाढल्या आहेत. याप्रकरणात प्रत्येक क्षणी मोठी अपडेट समोर येत आहे.

तर डिजीपींना तातडीने घटनास्थळी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही सायंकाळी घटनास्थळी जाणार आहेत. हेलिकॉप्टर अपघाताच्या पाहणीसाठी वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी घटनास्थळी जाणार आहेत. ते रुग्णायातही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायुसेनाप्रमुख अपघातस्थळी जाऊन अपघात कसा झाला याची प्रत्यक्ष माहिती घेणार आहे.