Thackeray Brothers : …त्याशिवाय निवडणूक नकोच, निवडणूक आयोगाच्या बैठकीत ठाकरे बंधू आक्रमक, काय केली आग्रही मागणी?
निवडणूक अधिकाऱ्यांसोवेतच्या बैठकीत ठाकरे बंधूंनी व्हीव्हीपॅट मशीन वापरण्याची आग्रही मागणी केली आहे. मतदाराला आपले मत कोणाला जाते हे कळावे, यासाठी व्हीव्हीपॅट आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
ठाकरे बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीनच्या वापराबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुका व्हीव्हीपॅटशिवाय नकोत अशी ठाम मागणी या बैठकीत केली आहे. मतदाराला त्याचे मत नेमके कोणाला जाते, हे व्हीव्हीपॅटमुळे कळेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. या महत्त्वपूर्ण बैठकीत राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी केली, जेणेकरून सविस्तर चर्चा होऊ शकेल. सध्या देशात कोठेही निवडणुका नाहीत, त्यामुळे व्हीव्हीपॅट आणण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. निवडणूक अधिकाऱ्यांनी विरोधकांच्या मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचे नमूद केले.
Published on: Oct 14, 2025 02:37 PM
