राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
मुंबईत आज ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गर्जना मोर्चा काढला. मेट्रो सिनेमाजवळून सुरू झालेल्या या मोर्चात बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी झाले. लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या हाकेने निघालेल्या या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबईत आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गर्जना मोर्चा निघाला. मेट्रो सिनेमाजवळून या मोर्चाला सुरुवात झाली असून, यात महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांनीही या मोर्चात आपली उपस्थिती दर्शवली. उद्धव ठाकरे वेस्टर्न हॉटेलमधून तर राज ठाकरे मेट्रो सिनेमाजवळ पोहोचल्यानंतर दोघे एकत्र आले.
हा मोर्चा मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयापर्यंत जाणार असून, त्यानंतर विराट सभेमध्ये त्याचे रूपांतर होईल. या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनी एकत्र येत एकाच व्यासपीठावर भाषण करणार आहेत. लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या उद्देशाने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून, या मोर्चातून कोणते राजकीय संदेश दिले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
