मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?

मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?

| Updated on: Jan 04, 2026 | 3:56 PM

ठाकरे बंधूंनी मुंबईसाठीचा वचननामा प्रकाशित केला आहे. यात शासकीय कर्मचाऱ्यांना घरे, महिलांसाठी स्वाभिमान निधी, मासाहेब किचन्स, स्वच्छतागृहे, पाळणाघरे, स्वयंरोजगार निधी आणि मराठी तरुणांसाठी वसतिगृहे यासारख्या अनेक योजनांचा समावेश आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार असे म्हटले आहे.

मुंबईसाठी ठाकरे बंधूंकडून वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 20 वर्षांनी शिवसेना भवनाला भेट देत हा वचननामा सादर केला. या वचननाम्यानुसार, शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचारी तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जातील. पुढील पाच वर्षांत एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

याशिवाय, नोंदणीकृत घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये स्वाभिमान निधी, कोळी आणि मच्छीमार महिलांना अर्थसहाय्य तसेच 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारी मासाहेब किचन्स सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक शहराचा महापौर मराठीच होणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली. मुंबईचा महापौर कायम मराठीच राहील यावर त्यांनी जोर दिला.

Published on: Jan 04, 2026 03:56 PM