Thackeray Brothers Melava : ‘तो’ क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी मेळाव्याला तुफान गर्दी

Thackeray Brothers Melava : ‘तो’ क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी मेळाव्याला तुफान गर्दी

| Updated on: Jul 05, 2025 | 11:23 AM

वरळी डोमच्या बाहेर मराठी माणूस कार्यकर्त्यांचा एकच जनसागर लोटला आहे. ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता आतुर झालेली असताना आजचा क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी तोबा गर्दी झाली आहे.

आज मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र येताना दिसणार आहे. वरळीच्या डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे ठाकरे बंधूं मराठीच्या मुद्द्यावर नेमकी कोणती भूमिका मांडणार? भविष्यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची उत्सुकता संपुर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी वरळी डोमच्या बाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी बघायला मिळत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी आणि एकत्र बघण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं आले आहेत. त्यामुळे वरळी डोमबाहेर तोबा गर्दी झाल्याची सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.  वरळी डोमच्या प्रवेशद्वारावर जमलेले कार्यकर्ते आता जाण्यासाठी एकच गेटवर रेटा करताय. यावेळी काही महिला कार्यकर्ते आणि इतर सामान्य नागरिकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. हा सर्व कार्यकर्त्यांचा जमाव मेळाव्यातील ठाकरे बंधूंना बघण्यासाठी गेटच्या आत घुसण्यासाठी अट्टहास करताना दिसतायत.

Published on: Jul 05, 2025 11:13 AM