Raj – Uddhav Thackeray : हिंदी भाषा सक्तीवरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande Reaction : ठाकरे बंधु हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र येणार आहेत. या एकत्रित मोर्चावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आता हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार आहेत. त्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. येत्या 5 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात ठाकरे बंधु एकत्र बघायला मिळण्याची शक्यता आहे. या एकत्रित मोर्चाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आता दुजोरा दिला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाबद्दल बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची ताकद ही एकत्रितपणे दिसणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात राहूनच मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न असेल, तर मराठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र अंगावर जाणं गरजेचं आहे. याबद्दल राज ठाकरेंनी घेतलेल्या कालच्या भूमिकेला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हंटलं आहे.
