राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी

राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी

| Updated on: Jan 10, 2024 | 6:08 PM

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एक मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीच नितीन देशमुख यांनी केली आहे. भाजपचे नेते जे सांगतील तोच निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे

अकोला, १० जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणावरील निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सुरू आहे. दरम्यान या निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या आमदाराने एक खळबळजनक मागणी केल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एक मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीच नितीन देशमुख यांनी केली आहे. भाजपचे नेते जे सांगतील तोच निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट केल्यास सर्व निकाल बाहेर येईल, असं वक्तव्य करत नितीन देशमुख यांच्या मागणीने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना न्यायाधीशाचा दर्जा होता. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणं हे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 10, 2024 06:07 PM