सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

| Updated on: May 09, 2026 | 6:06 PM

तामिळनाडूमधून सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, तरी सरकार स्थापनेचा मार्ग स्पष्ट झालेला नव्हता.

तामिळनाडूमधून सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला असला, तरी सरकार स्थापनेचा मार्ग स्पष्ट झालेला नव्हता. बहुमताच्या आकड्यांमध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. आता मात्र थलपती विजयचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. सध्या टीव्हीके पक्षाकडे 108 जागा होत्या. मात्र विजय थलपती हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 वर येणार होती. विजय थलपती आणि राज्यपाल यांच्या वारंवार भेटीगाठी होताना दिसत होत्या. मात्र अलीकडेच मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजयला VCK पक्षाच्या पाठिंब्यामुळे बहुमताचा आकडा मिळवण्यात यश आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, थोड्याच वेळात टीव्हीकेची पत्रकार परिषद सुरू होऊ शकते. यामध्ये बातमीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. अद्याप कोणती स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Published on: May 09, 2026 05:47 PM
Follow Us