MNS Raj Thackeray: इथर भैय्याका चलेगा… कौन राज ठाकरे? वस्तरा मारेंगे, यहाँ हमारा…परप्रांतियाच्या मुजोरी नंतर मनसेचा चोप

MNS Raj Thackeray: इथर भैय्याका चलेगा… कौन राज ठाकरे? वस्तरा मारेंगे, यहाँ हमारा…परप्रांतियाच्या मुजोरी नंतर मनसेचा चोप

| Updated on: Nov 25, 2025 | 10:44 AM

ठाण्यातील गांधीनगर येथे एका परप्रांतीय रिक्षाचालकाने दारूच्या नशेत राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ करत गांधीनगर आमचं आहे अशी मुजोरी केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने पोलीस ठाण्यात त्याला चोप दिला. माफी मागताना चालकाने दारूच्या नशेत चूक झाल्याचे म्हटले.

ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. शैलेंद्र यादव असे या रिक्षाचालकाचे नाव असून, तो दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याने हे गांधीनगर आहे, इथे फक्त भैय्या लोकांचेच राज्य चालेल अशा आशयाची वक्तव्ये केली. तसेच, मराठी माणसाला आव्हान देत “कोणी बोललं तर हम वस्तरा मार देंगे” अशी धमकीही दिली.

या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसेने तीव्र भूमिका घेतली. पोलिसांनी शैलेंद्र यादवला अटक केली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात त्याला चोप दिला. मारहाणीनंतर शैलेंद्र यादवने आपली चूक मान्य करत दारूच्या नशेत बोलून गेलो, असे सांगत हात जोडून माफी मागितली. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील परप्रांतीय आणि स्थानिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Published on: Nov 25, 2025 10:44 AM