Shirdi : साईनगरीत हर मस्जिदपर तिरंगा, शिर्डीतील अनोख्या उपक्रमाने वेधले लक्ष

| Updated on: Aug 11, 2022 | 9:11 PM

हर घर तिरंगा हा उपक्रम देशाच्या राजधानीपासून ते गल्लीपर्यंत राबवला जात आहे. 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. साईनगरीत आजही सर्वधर्मिय एकदिलाने आणि गुण्यागोविंदाने नांदतात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात त्याच भावनेतुन देशाभिमान आणि श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठी हिंदू-मुस्लीम बांधवानी बैठकीत सहमती दर्शवण्यात आली आहे.

Follow us on

शिर्डी : संबंध देशात आता देशाच्या स्वांतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. देशाचे वेगळेपण आणि राष्ट्रप्रेम हे त्यामागचा उद्देश आहे. सर्वच ठिकाणी ही तयारी सुरु असली तरी साईनगरीत विविध धर्मियांच्या सहयोगातुन ‘हर मंदिर-मज्जिद पर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती शिर्डीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे.साईमंदिरासह शिर्डीतील इतर मंदिरे आणि मज्जिदीवर तिरंगा फडकणार आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम देशाच्या राजधानीपासून ते गल्लीपर्यंत राबवला जात आहे. 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी हा उपक्रम राबवला जाणार आहे. साईनगरीत आजही सर्वधर्मिय एकदिलाने आणि गुण्यागोविंदाने नांदतात एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात त्याच भावनेतुन देशाभिमान आणि श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठी हिंदू-मुस्लीम बांधवानी बैठकीत सहमती दर्शवण्यात आली आहे.