Pune | असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरणाची शिबिरे भरवणार – Neelam Gorhe
'स्वयंसिद्धा भाग दोन' या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यामध्ये कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षित असलेल्या मदतीचे सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील.
पुणे : ना.डॉ.नीलम गोऱ्हे (उपसभापती विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य) यांनी महाराष्ट्रातील तमाम भाऊ-बहिणींना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच या पवित्र सणानिमित्त वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमात प्रमुख्याने स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटित आणि असंघटित महिला कामगारांना लसीकरणाची शिबिरे भरवण्यात येणार, प्राथमिक स्तरावर मुंबई, पुणे आणि संभाजी नगरमध्ये पुढच्या आठवड्यापासून हे शिबिर सुरू होणार आहे. ‘स्वयंसिद्धा भाग दोन’ या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यामध्ये कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षित असलेल्या मदतीचे सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. या कामात अपर्णा पाठक, झेलम जोशी या समन्वयक म्हणून तर फरिदा लांबे, मेधा कुलकर्णी, मृणालिनी जोग आदींचे सहकार्य असेल असेही त्या म्हणाल्या.
