TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 4 November 2021

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 4 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 10:58 AM

दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 6.07 रुपये आणि 11.75 रुपयांनी कमी झाले. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. सरकारने अबकारी दरात कपात केली असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून जवळपास दररोज इंधनाचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे आणखी काही दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा पूर्वीच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.