VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 16 February 2022
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी काल ठाकरे कुटुंबाचा आणि बंगल्यांचा काही संबंध आहे, ही बाब नाकारली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचं जोरदार खंडन केलं. अलिबागजवळील कोरलाई गावात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले आपल्या नावावर केले असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्याविरोधात पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी काल ठाकरे कुटुंबाचा आणि बंगल्यांचा काही संबंध आहे, ही बाब नाकारली होती. अलिबागमधील ती बेनामी प्रॉपर्टी असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. असे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना जोड्यानं मारू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. या आरोपांना उत्तर देताना किरीट सोमय्या यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत मोठा हंगामा केला. मला जोड्याने मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांनी हे पुरावे पहावे, तपासाने आणि मग हवं असेल तर मला जोड्यानं मारावं, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेतच पायातले जोडे काढले
Published on: Feb 16, 2022 12:27 PM
