TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 23 January 2022

| Updated on: Jan 23, 2022 | 10:44 PM

भाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते आणि राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित होते.

Follow us on

भाजपसोबत युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं, अशी टीका भाजप नेत्यांकडून केली जाते. भाजपच्या या टीकेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते आणि राज्यभरातील शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “वाघाचं कातडं पांघरलेली शेळी असते तसं त्यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्वाला सोडलं नाही. वापरायचं आणि टाकून द्यायचं हा भाजपचा स्वभाव आहे. हे हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत. सोयीप्रमाणे बदलतात. सत्ता पाहिजे म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांशी युती, सत्ता हवी म्हणून मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युत्ती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटाव या वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूंशी युती, हे आपलं हिंदुत्व नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय.