VIDEO : Nanded | नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

| Updated on: Jul 18, 2021 | 2:21 PM

रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलीय. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या जलधारांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आज पर्यटकांनी इथे गर्दी केलीय.

Follow us on

रविवारच्या सुट्टीमुळे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी केलीय. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या जलधारांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आज पर्यटकांनी इथे गर्दी केलीय. यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे 125 कि.मी. दूर असलेला हा धबधबा नांदेड-किनवट मार्गावर ‘इस्लापूर पाटी’ पासून ५ कि.मी तर किनवटपासून 50 कि.मी. अंतरावर आहे.