Satara | आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत

| Updated on: Mar 14, 2026 | 5:09 PM

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यासह परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम हळदीच्या विक्रीवर होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यासह परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम हळदीच्या विक्रीवर होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात हळदीला 18 ते 20 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. मात्र सध्या हा दर घसरून 12 ते 13 हजार रुपयांपर्यंत आला आहे. शेतकऱ्यांच्या मते, यावर्षी अनेकांनी हळदीची लागवड वाढवली होती. परंतु आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हळदीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यातीमध्ये मोठा शॉर्टफॉल निर्माण झाला असून बाजारभाव घसरले आहेत. हळदीचा सरासरी दर पूर्वी 16 ते 17 हजारांच्या घरात होता. मात्र आता तो लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची हळद शेतातच पडून राहिली असून विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Published on: Mar 14, 2026 05:09 PM
Follow Us