LIVE : ‘लोकसभेचा महासंग्राम’, टीव्ही 9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये कोण-कोणते होणार राजकीय गौप्यस्फोट अन् दावे?

LIVE : ‘लोकसभेचा महासंग्राम’, टीव्ही 9 च्या कॉन्क्लेव्हमध्ये कोण-कोणते होणार राजकीय गौप्यस्फोट अन् दावे?

| Updated on: Mar 01, 2024 | 11:27 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीकडून आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार

मुंबई, १ मार्च २०२४ : लोकसभेचं घोडामैदान जवळ येऊन ठेपलं आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीकरता खास रणनिती आखण्यासह मोठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यादरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीकडून आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॉन्क्लेव्हमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. आज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत वाय. बी. चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात हे विशेष चर्चासत्र रंगणार आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक असलेल्या 48 जागा मिळवण्यासाठी युती आणि आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील दिग्गज नेत्यांचे डावपेच कसे असतील, राज्याचा मूड काय आहे, मतदारांचा कौल कुणाला असेल, निवडणुकीसाठी रणनिती काय, यासारख्या अनेक विषयांवर आज ‘लोकसभेचा महासंग्राम’ या वैचारिक मंचावर राजकीय खडाजंगी होताना पाहायला मिळणार आहे.

Published on: Mar 01, 2024 11:27 AM