CM Uddhav Thackeray LIVE | उघडलेल्या शाळा पुन्हा बंद पडणार नाही, हा निर्धार करुया : उद्धव ठाकरे

| Updated on: Oct 04, 2021 | 2:47 PM

शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनां पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow us on

विद्यार्थ्यांना शाळेत जाऊ कधी असा प्रश्न पडला होता. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी याची सुरुवात माझे कुटुंब माझी जबाबदारी पासून झाली. मुलं ही फुलांसारखी असतात. आज शाळेचं दार उघडलं आहे ते विद्यार्थ्यांच्या भविष्याचं दार उघडलं आहे. माझी शिक्षक आणि पालकांना विनंती आहे, आपल्या पाल्याची जबाबदारी व्यवस्थितपणे घ्या आम्ही सोबत आहोत. एखाद्या शिक्षकाची तब्येत बिघडली असल्यास त्यांनी टेस्ट करुन घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यास तातडीनं उपचार करुन घ्यावेत.

रवींद्रनाथ टागोरांची शाळा शांतीनिकेतन द्वारे शिक्षण सुरु केलं होतं. शाळांच्या वर्गांची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा. शाळांचं निर्जंतुकीकरण करा, स्वच्छतालय देखील स्वच्छ असावीत. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनां पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.