Uddhav Thackeray : एकदा गळा घोटला की चरायला कुरण मोकळं… उद्धव ठाकरेंचा निशाणा नेमका कोणावर?
मुंबईतच हक्काचे घर मिळावे या प्रमुख मागणीसह मुंबईतील आझाद मैदानात गिरणी कामगारांचा विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा निघालाय. या मोर्चात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यावर घणाघात केला.
केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. त्याच मुंबईत दिल्लीतील मालकाचे नोकर मुंबईकरांना बाहेर काढायला असूसलेला आहे. त्यांना मुंबई हवी, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांनी घेरलं. पुढे ते असेही म्हणाले, दोन व्यापारी तिकडे बसले आहेत. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं. म्हणूनच मराठी माणसात आग लावायची, मराठी अमराठी भेद करून भेदाभेद करून आपल्यात फूट पाडण्याचा डाव आहे. एकदा का हा डाव साधला. की यांना चरायला कुरण मोकळं झालं, असं ठाकरे म्हणाले.
एका बाजूला आपण एक लढा लढत आहोत. धारावीचा लढा. आपल्यावर जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईतील मराठी माणूस बाहेर काढला. अरे आहे ना मुंबईतच आहे. आम्ही तुम्हाला राजकारणात इथेच गाडणार आहोत. इथेच ठेचणार आहोत. या राज्यकर्त्यांना सांगतो. मराठी माणूस एकवटला आहे. विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं.
