उज्ज्वल निकमांनी राज्यसभेत मराठीतून घेतली खासदारकीची शपथ
ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली आहे.
ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. यासाठी निकम यांचं संपूर्ण कुटुंब संसदेत उपस्थित होते. विशेष म्हणजे उपसभापती यांना आवर्जून सांगत उज्ज्वल निमक यांनी मराठी मधून देखील राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली.
प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला फोन करून या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्याचं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज निकम यांनी राज्य सभेत खासदारकीची शपथ घेतली. दरम्यान, यावेळी त्यांचं कुटुंब देखील याठिकाणी उपस्थित होतं. राष्ट्रपती कोट्यातून नामनिर्देशित करण्यात आलं त्याचा आनंद आहे. ते आजपासून राजकीय क्षेत्रात जातायेत याचा आनंद आहे, अशा भावना निकम यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्या.
