Amit Shah | केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार
पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
मुंबई : केंद्रीय अमित शाह लवकरच दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, तसेच ते रविवारी पुण्यात असणार आहेत. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. पुण्यात ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करणार आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
