Satara Rain Update | अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे नुकसान….

Satara Rain Update | अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे नुकसान….

| Updated on: May 14, 2026 | 11:02 AM

राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, सातारा आणि परभणी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सातारा शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे सुमारे 40 घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर झाडे आणि विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, सातारा आणि परभणी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सातारा शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे सुमारे 40 घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर झाडे आणि विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभावित नागरिकांनी तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, बामनोलीजवळील शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन जाणारी बोट वादळी पावसात बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने दोन्ही पर्यटक पोहत किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. मात्र, बोट चालक रुपेश धोंडीबा तांबे बेपत्ता असून, त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
या घटनेनंतर सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, परभणी जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

Published on: May 14, 2026 11:02 AM
Follow Us