Trump Tariffs : अमेरिकेला धडकी! ट्रम्पच्या टेरिफविरोधात भारत, रशिया अन् चीनची युती… नेमकं घडतंय काय?
टॅरिफ वॉर खेळणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जबर झटका देण्याची रणनीती आखली जातेय. ट्रम्प यांनी आता व्यापारावरून सुद्धा धमकी दिलीये. पण जगभरात घेरण्यासाठी ट्रम्प यांच्या विरोधात भारत, रशिया आणि चीनची युती होण्याची शक्यता आहे.
भारतावर 50% व्यावसायिक कर लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नवी धमकी दिलीये. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत व्यापारावर पुढे चर्चा नाही असं ट्रम्प म्हणाले. आता समस्या नेमकी आहे ती म्हणजे भारताची रशियासोबतची तेल खरेदी. हीच ट्रम्प यांची पोटदुखी आहे. ट्रम्प यांनी टॅरिफच्या माध्यमातनं भारत आणि चीन या दोघांशी पंगा घेतला. त्यामुळे भारताविरोधात 50% टॅरिफ लावल्यानं चीननं अमेरिकेला सुनावले.
अमेरिकन टॅरिफचा नेहमीच दुरुपयोग केला. बादशाला एक इंच जमीन दिली तर त्याला मैलभर पाहिजे. जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेच्या टॅरिफविरोधात कायदेशीर कारवाई करू. तर रशियन सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारलं. अमेरिकेच्या अशा धमक्यांमुळे भारतासह प्रमुख जागतिक सहकारी असलेल्या देशांमध्ये अमेरिकेची विश्वासार्हता कमी होतेय. अमेरिकेकडून लादलेलं टॅरिफ हे अन्यायपूर्ण आहे. अमेरिका स्वतः रशियाकडून यूरेनियम, पॅलेडियम आणि खतं खरेदी करते. मग भारतावर टॅरिफ लादणं हे दुट्टपी धोरण आहे. भारत आपलं राष्ट्रीय हित जपत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवेल. रशिया, भारत आणि चीन या त्रिपक्षीय गटाला पुन्हा सक्रिय करण्यास रशियाचा पाठिंबा आहे. रशियानं भारताच्या बाजूने उभं राहतानाच भारत, रशिया आणि चीन या देशांच्या सहकार्य गटाला पुन्हा सक्रिय करण्याबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
