Nagpur | नागपुरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
ओमिक्रॅान आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालीय. नागपूर शहरात 47 तर ग्रामीण मध्ये 65 ठिकाणी लसीकरणाची सोय आहे. या केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून मुलांना आधारकार्ड आणि मोबाईल सोबत ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय.
ओमिक्रॅान आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालीय. नागपूर शहरात 47 तर ग्रामीण मध्ये 65 ठिकाणी लसीकरणाची सोय आहे. या केंद्रांवर ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून मुलांना आधारकार्ड आणि मोबाईल सोबत ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहर आणि ग्रामीण मिळून 2 लाख 48 हजार 266 मुलांना लस दिली जाणार आहे. काही शाळांच्या विनंतीवरून शाळेतही लसीकरण होणार आहे.
