दादरा-नगर हवेलीतील विजय न्याय मिळवण्यासाठी होता : आदित्य ठाकरे

| Updated on: Nov 03, 2021 | 3:58 PM

दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत . शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित (Mahesh Gavit) आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांच्यात तिरंगी लढत झाली.

Follow us on

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवली. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित (Mahesh Gavit) आणि काँग्रेसचे महेश धोदी (Mahesh Dhodi) यांच्यात तिरंगी लढत झाली. पोटनिवडणुकीत 75.91 टक्के मतदान पार पडलं. 333 मतदान केंद्रांवर मतदान झालं. भाजपकडून या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला. दादरा नगर हवेलीच्या जनतेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना विजयी केलं आहे. कलाबेन डेलकर यांना 1 लाख 16 हजार 834 तर भाजपच्या महेश गावित यांना 66 हजार 157 मतं मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा 50 हजार 677 मतांनी पराभव केला. दरम्यान, दादरा-नगर हवेलीतील विजय न्याय मिळवण्यासाठी होता, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.