मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार? विजय वडेट्टीवार म्हणाले…

| Updated on: Jun 14, 2021 | 5:43 PM

ध्या अनलॉकच्या लेव्हल करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. मुंबई ज्यावेळी अनलॉकच्या पहिल्या लेव्हलमध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल सुरु केली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Follow us on

मुंबई: मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये लोकल सेवा कधी सुरु करण्यात येणार बाबत माहिती दिली. मुंबई सध्या अनलॉकच्या लेव्हल करण्यात आल्या आहेत त्यामध्ये तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. मुंबई ज्यावेळी अनलॉकच्या पहिल्या लेव्हलमध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल सुरु केली जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. कोरोना संसर्ग गेलेला नाही त्यामुळे लोकांनी जबाबदारीनं वागावं, असं देखील वडेट्टीवार म्हणाले. लोकांनी जबाबदारीनं वागल्यास कोरोना निर्बंध कमी होतील, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. राज्यात अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना वेगवेगळ्या सत्रावर अनलॉक करत आहोत. पण सर्वांनी लक्षात ठेवावं की कोरोना गेलेला नाही. मास्क वापरा, सोशल डिस्टनिंग पाळा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. तसंच आपला जिल्हा कुठल्या लेव्हलमध्ये ठेवायचा हे आता जनतेनं ठरवायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत अजून लोकलबाबत निर्णय झालेला नाही. कारण मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. तिथली परिस्थिती सुधारली तर आम्हीही निर्णय घेऊ, असंही वडेट्टीवार म्हणालेत.