Palghar | ईईईई… गटारातील पाण्यात चक्क फळे धुतली; विरारमधील व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल

| Updated on: Feb 05, 2026 | 12:15 PM

पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फेरीवाला चक्क गटाराचं अत्यंत घाणेरडं आणि दूषित पाणी फळांवर टाकत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक फेरीवाला चक्क गटाराचं अत्यंत घाणेरडं आणि दूषित पाणी फळांवर टाकत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. हा प्रकार एका जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आला. फळे साफ करण्याच्या नावाखाली गटारातील पाणी वापरले जात असून हीच फळे कोणतीही प्रक्रिया न करता थेट नागरिकांना विकली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे विरारसह संपूर्ण वसई-विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वसई-विरार परिसरात अशा प्रकारे सर्रासपणे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधित जागरूक नागरिकाने फळ विक्रेत्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेले, मात्र पोलिसांनी “हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही” असे सांगत कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप त्या नागरिकाने केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करत आता थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचेही त्या नागरिकाने स्पष्ट केले आहे.

Published on: Feb 05, 2026 12:15 PM