Mahadev Munde Case : महादेव मुंडेंशी ना ओळख ना कधी पाहिलं… हत्येच्या रात्री माझे वडील… कराडच्या मुलाचा मोठा दावा अन्..
'महादेव मुंडे हत्या प्रकरणात आमची कुठलीही चौकशी झालेली नाही. ज्या दिवशी आम्हाला चौकशीला बोलावतील त्या दिवशी आम्ही चौकशीला जायला तयार आहोत.'
महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत वाल्मिक कराडच्या मुलाने खळबळजनक दावा केला. सुशील कराड म्हणाला, महादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो. ना मी त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या भावाने त्यांना कधी पाहिलं होतं, ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिलं होतं, असा खळबळजनक दावा वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडने केला. पुढे सुशील कराडने असंही म्हटलं की, महादेव मुंडे यांचा मर्डर झाला असं म्हणतात.. महादेव मुंडे यांचा मर्डर झाला त्यादिवशी रात्री माझे वडील महादेव मुंडेंच्या सासऱ्यांसोबत तिरुपतीला होते. दरम्यान सुशील कराडच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कराडच्या या दाव्यावर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कराडच्या मुलाच्या खळबळजनक दाव्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंनी हत्येच्या तपासावरून एकच सवाल केला. महादेव मुंडे यांना तुम्ही ओळख नाही तर पोलिसांना का फोन केले? या हत्येच्या प्रकरणाचा तपास का थांबवण्यात आला? असेही ज्ञानेश्वरी मुंडे यावेळी म्हणाल्या.
