Washim | वाशिममध्ये वारंवार वातावरणात बदल, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

| Updated on: Jan 12, 2022 | 11:55 AM

वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील  पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला […]

Follow us on

वाशिम जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.मात्र हे धुकं रब्बीतील  पिकासाठी घातक ठरणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व धुकं पडत असल्यामुळे ऐन मोसमात असलेल्या हरबरा, गहू ,हळद,आणि भाजीपाला पिकावर या धुक्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.