Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

| Updated on: Oct 30, 2026 | 2:37 PM

वाशिममध्ये ठाकरे गटाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक लाखाच्या मदतीची मागणी करत समृद्धी महामार्गाकडे मोर्चा काढला. पोलिसांची परवानगी नाकारलेली असतानाही आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व कार्यकर्ते शेलू बाजाराजवळ समृद्धी महामार्गावर पोहोचले आहेत. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत बॅरिकेड्स लावले आहेत.

वाशिम जिल्ह्यात ठाकरे गटाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शेतकरी समृद्धी महामार्गाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शेलू बाजाराजवळ समृद्धी महामार्गावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केले असून, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रचंड फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आमदार नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे काही आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सध्या पोलीस आणि आंदोलक आमनेसामने असून, पोलीस आंदोलकांना ताब्यात घेण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांसाठी वाढीव मदत मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि कमांडो तैनात केले आहेत.

Published on: Oct 30, 2026 2:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us