मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ड्रोन दृश्य पाहा, प्रचंड गर्दीतून फुलांची वृष्टी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ड्रोन दृश्य पाहा, प्रचंड गर्दीतून फुलांची वृष्टी

| Updated on: Aug 27, 2025 | 6:29 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा देत मुंबईकडे कूच केले आहे. आता या विशाल मोर्चाची ड्रोन दृश्ये समोर आली आहेत. मनोज जरांगे यांना जागोजागी थांबवून त्यांचा सत्कार केला जात आहे. सत्कार स्वीकारत मनोज जरांगे पुढे चालले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने त्यांची घेराबंदी करण्यासाठी अटी आणि शर्थी लादल्या आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सरकारच्या सर्व अटी मान्य असल्या तरी एका दिवसाचे आंदोलन होऊ शकत नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपण या सर्व अटी आणि शर्थी नीट वाचून यावर सविस्तर प्रतिक्रीया देऊ असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्यासाठी आंतरवाली सराटीतून सकाळी १० वाजता निघाले आहेत. त्यांच्यामागे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांचा ताफा आहे. तसेच कार्यकर्त्यांकडून चौका-चौकात त्यांच्यावर फुलांची वृष्टी होत आहे. या सर्व मोर्चाची ड्रोन दृश्य आता आली आहे. मनोज जरांगे यांचा ताफा आता संभाजीनगरात पोहचला आहे. मनोज जरांगे पाटील पुण्यात आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुक्काम करणार आहेत. पुणे येथील वाहतूक व्यवस्था या मोर्चाच्या दृष्टीने चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे.

Published on: Aug 27, 2025 05:49 PM