मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत आपल्या आरपीआय पक्षासाठी 14-15 जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगर पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षासाठी 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे. आरपीआयचे जरी जास्त संख्याबळ नसले तर आरपीआय ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार सत्तेत येते असेही आठवले यांनी म्हटले आहे. आरपीआय आधी काँग्रेस सोबत होते तेव्हा काँग्रेसचे सरकार आले होते. नंतर आरपीआय शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार आले. त्यामुळे आरपीआयला सन्मानजन्य जागा मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन चूक केली आहे. मुंबईत ४० टक्के मराठी तर ६० परप्रांतीय आहेत. ४० टक्के मराठी माणसात महायुतीला मतदान करणारेही आहेत त्यामुळे मनसेची युती उद्धव ठाकरे यांना फळणार नाही असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
Published on: Dec 27, 2025 04:29 PM
