मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीदरम्यान झालेल्या वादानंतर…

मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीदरम्यान झालेल्या वादानंतर…

| Updated on: May 06, 2026 | 2:19 PM

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते आजही जल्लोष करताना दिसत आहेत या आनंदाच्या वातावरणादरम्यानच हिंसाचार उफाळल्याचं समोर येत आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे. सुरुवातीच्या कलांपासूनच भाजपच्या विजयाचे चिन्ह दिसत होते. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप नेते आजही जल्लोष करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. या आनंदाच्या वातावरणादरम्यानच हिंसाचार उफाळल्याचं समोर येत आहे.

भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती, यादरम्यान टीएमसी आणि भाजप यांच्यात वाद पेटला होता. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या हाणामारीत झाले. निवडणुकीचा निकाल लागताच बंगालमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. यावेळी भाजपच्या दोन तर टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमका कोणाकडून झाला हे स्पष्ट झालेले नाही, मात्र दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हिंसाचार केल्याचे आरोप केले आहेत.

Published on: May 06, 2026 02:19 PM
Follow Us