बाळासाहेब ठाकरे यांचे विधानभवनातील तैलचित्र कुणी आणि कसं साकारलं? पहा पहिली झलक
स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र २३ जानेवारीला त्यांच्या जयंतीदिनी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची पूर्व तयारी झाली आहे.
ठाणे : शिंदे फडणवीस सरकारने हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २३ जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्याला मंत्रिमंडळ, आमदार, खासदार उपस्थित रहाणार आहेत.
ठाकरे कुटूंबियांना या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नाहीत अशी माहिती मिळतेय.
बाळासाहेब ठाकरे यांचे हे तैलचित्र चंद्रकला कदम यांनी साकारले आहे. बाळासाहेब यांचे तैलचित्र साकारण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया चंद्रकला कदम यांनी TV९ मराठीशी बोलताना दिली आहे.
Published on: Jan 21, 2023 09:22 AM
