Nana Patole : विधान परिषदेचं विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, नाना पटोलेंचं वक्तव्य

| Updated on: Jul 17, 2022 | 10:20 PM

नवीन सरकार आले, की मागच्या सरकारचे निर्णय रद्द ठरवणे योग्य नाही, अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली. लोकशाही (Democracy) वाचवणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भीती नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Follow us on
मुंबई : आम्ही विधान परिषद निवडणुकीसाठी विरोधीपक्ष नेतेपद मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. आम्हीं जी निधी मंजूर केला होता तो थांबवण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. आम्ही राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकत्र बसू आणि लवकरच याबाबत राज्यपाल (Governor) यांना जाऊन पत्र देऊ. जर त्यांनी एकले नाही, तर आम्ही याविषयी कोर्टात जाऊ. नवीन सरकार आले, की मागच्या सरकारचे निर्णय रद्द ठरवणे योग्य नाही, अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली. लोकशाही (Democracy) वाचवणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. एका पक्षाला एक न्याय आणि दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय देण्याचा प्रयत्न राज्यपाल करत आहेत. लोकशहीसाठी हे मारक आहे. यासंदर्भात रामण्णा यांनी वक्तव्य केले होते.