Kishori Pednekar | “तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच” किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा

Kishori Pednekar | “तुम्ही सत्तेत बसा, आम्ही बघतोच” किशोरी पेडणेकरांचा महायुतीला थेट इशारा

| Updated on: Jan 17, 2026 | 4:50 PM

आम्ही आमचे गड राखलेत, मुंबईकरांशी आमची बांधिलकी आहे. आमच्याकडे निष्ठा होती. 'तुम्ही सत्तेत बसा आम्ही बघतोच' असं म्हणत पेडणेकरांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केलंय, आम्ही आमचे गड राखलेत, मुंबईकरांशी आमची बांधिलकी आहे. आमच्याकडे निष्ठा होती. ‘तुम्ही सत्तेत बसा आम्ही बघतोच’ असं म्हणत पेडणेकरांनी महायुतीला थेट इशारा दिला आहे. भाजपचे फार फार तर 83 वरून 88 झालेत. सत्ता, बत्ता, गुंड आणि पैसा सगळंच भाजपकडे होती म्हणून निवडून आलेत,असा टोला पेडणेकरांनी भाजपवर लावला आहे. मात्र आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आणि निष्ठेच्या बळावर लढलो आहोत असं वक्तव्य करत किशोरी पेडणेकरांनी विरोधकांना चांगलंच डिवचलं आहे.

 

 

Published on: Jan 17, 2026 04:50 PM