Badlapur मध्ये धुळवडीच्या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

Badlapur मध्ये धुळवडीच्या दिवशी ह्रदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 10:00 AM

धुळवडीला (Holi) रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात (Badlapur) ही घटना उघडकीस आली आहे.

बदलापूर : धुळवडीला (Holi) रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात (Badlapur) ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात आशुतोष संसारे हा 28 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. आशुतोषचं अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं, मात्र संसार फुलण्याआधीच रंग उडाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

धुळवडीला रंग खेळून घरी गेल्यानंतर एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील एका गृहसंकुलात आशुतोष संसारे राहत होता. धुळवडीनिमित्त आशुतोष त्याच्या संकुलात रंग खेळून, नाचून हा तरुण घरी गेला. मात्र घरी जाताच त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.