झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही हे…

झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली खंत म्हणाले, पक्षाला आमची किंमत नाही हे…

| Updated on: Feb 22, 2024 | 6:31 PM

'माझा काँग्रेस सोडण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असताना काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची मुबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. यावरच झिशान सिद्दीकी यांनी भाष्य केले आहे. माझी हकालपट्टी होईल याची....'

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार गटात सामील झाले तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी मात्र काँग्रेसमध्येच आहेत. माझा काँग्रेस सोडण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. असे असताना काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांची मुबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. यावरच झिशान सिद्दीकी यांनी भाष्य केले आहे. माझी हकालपट्टी होईल याची मला कल्पना होतीच. पण मला हटवायचं होतं तर संपर्क साधला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी खंत व्यक्त केली. तर काँग्रेस पक्षाला आमची किंमत नाही हे दुर्दैवी आहे. मला काल या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली. मला कोणताही मेल, किंवा मेसेज मिळालेला नाही. मी १२ वर्ष काँग्रेस पक्षासाठी दिलेले आहेत. मला पदावरून हटवायचेच होते तर त्यांनी मला थेट संपर्क करायला हवा होता. मात्र त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे. मला समाजमाध्यमांमार्फत समजलेले असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Feb 22, 2024 06:31 PM