राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर तीन दिवसात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त

गेल्या तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) केला आहे.

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर तीन दिवसात 3 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 8:23 AM

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू होऊन अवघे तीन दिवस उलटले आहे. गेल्या तीन दिवसात आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, पोलीस यांनी 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Code of conduct Violence) केला आहे. यात 1 कोटी 36 लाखांची रोख रक्कम, 1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य, 29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ आणि 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने (Code of conduct Violence) यांचा समावेश आहे. ही माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981, सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 आणि खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक, बॅनर, कटआऊट व झेंडे काढण्यात (Code of conduct Violence) आले आहेत. तसेच सर्व जाहिराती, पोस्टर आणि कटआऊट हटवण्याची सूचनाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. हे सर्व साहित्य दिलेल्या मुदतीत काढण्यात येत आहे.

आतापर्यंत आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये आणि पर्यावरणाला हानी पोहचेल अशा वस्तू टाळाव्यात, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे (Maharashtra Assembly election 2019) निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
  • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
  • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
  • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

संबंधित बातम्या :

भाजपची 115 उमेदवारांची यादी तयार, 25 विद्यमान आमदारांना डच्चू – सूत्र

राज्यात शांततेत, पारदर्शक आणि सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

पुणे विधानसभा निवडणूक : 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील

राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.