'लीलावती'च्या विशेष कक्षात संजय राऊत-आशिष शेलारांचं गुफ्तगू

माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि आशिष शेलार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये आले होते.

BJP Leader meets Sanjay Raut, ‘लीलावती’च्या विशेष कक्षात संजय राऊत-आशिष शेलारांचं गुफ्तगू

मुंबई : एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला भाजपचे नेतेही दाखल झाले आहेत. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी (BJP Leader meets Sanjay Raut) लीलावती हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यानंतर ‘लीलावती’च्या विशेष कक्षात संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुफ्तगू झालं.

भाजप आणि शिवसेना यांची बोलणी फिस्कटल्यामुळे तूर्तास भाजपकडून कोणताही नेता संजय राऊत यांच्या भेटीला येणार नाही, असा कयास होता. परंतु आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी अशा परिस्थितीतही राजकारणापलिकडचे ऋणानुबंध जपल्याचं चित्र आहे. शेलार आणि राऊत यांच्यामध्ये दहा मिनिटं चर्चा झाली. एकीकडे सत्तासंघर्ष तीव्र झालेला असताना शेलार आणि राऊत यांच्यामध्ये काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजलेला नाही.

सत्तास्थापनेवरुन बोलणी फिस्कटल्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमनेसामने आले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी राऊत आणि शेलार यांची रुग्णालयात भेट झाली.

‘वैचारिक मतभेद असो वा, नसो, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरुन आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो, त्यामागे कोणतीही राजकीय घडामोड नाही. त्यांना कमी बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे आमचीही तीच इच्छा आहे. भाजप पदाधिकारी प्रताप आशरही अॅडमिट असल्यामुळे त्यांचीही भेट घेतली ‘ अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

BJP Leader meets Sanjay Raut, ‘लीलावती’च्या विशेष कक्षात संजय राऊत-आशिष शेलारांचं गुफ्तगू

संजय राऊत रुग्णालयात

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज असल्याचं निदान अँजिओग्राफीमध्ये झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. काल दुपारी अस्वस्थता जाणवू लागल्याने संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं. मात्र राऊत यांची लेखणी रुग्णालयातही त्याच वेगाने चालत आहे. संजय राऊत यांचा रुग्णालयातील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे.

BJP Leader meets Sanjay Raut, ‘लीलावती’च्या विशेष कक्षात संजय राऊत-आशिष शेलारांचं गुफ्तगू

व्हिडीओमध्ये संजय राऊत टेबलवर बसून लिखाण करताना दिसत आहेत. संजय राऊत यांच्यावर उपचार सुरु असतानाही ते आपलं प्रथम कर्तव्य अर्थात लिखाण करत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र सामनाचं संपादकीय संजय राऊत यांनी लिहून काढलं.

संजय राऊतांच्या लेखणीला तीच धार, तोच वेग, ‘सामना’चं संपादकीय थेट लीलावती रुग्णालयातून

संजय राऊत यांच्या लेखणीची धार संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. संजय राऊत यांची लेखणी आणि गेल्या 8-10 दिवसांपासून सुरु असलेल्या पत्रकार परिषदा, यामुळे शिवसेना सत्तास्थापनेच्या ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळाली. मात्र अटीतटीच्या क्षणी संजय राऊत यांची प्रकृती काहीशी बिघडली आणि त्यांना रुग्णालयात जावं लागलं.

याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरेही भेट (BJP Leader meets Sanjay Raut) घेऊन आल्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *